
नवी दिल्ली : वाहननिर्मितीसाठी आवश्यक घटकांचे उत्पादन करणारी टाटा ऑटोकॉम्प आणि युरोपियन उत्पादक स्कोडा ग्रुप यांनी रेल्वे प्रोपल्शन सिस्टिम आणि घटकांच्या निर्मितीसाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त मालकीची नवी कंपनी मध्यम, उच्च गतीच्या आणि प्रादेशिक रेल्वेगाड्या, मेट्रो आणि हलक्या रेल्वे वाहनांसाठी कन्व्हर्टर, ड्राइव्ह आणि सहाय्यक कन्व्हर्टर तयार करणार आहे.