esakal | Air India Auction | एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे? डिसेंबरपर्यंत घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Air-India-Company

Air India: अखेर एअर इंडियाचा भारताला 'टाटा'? केंद्राचेही स्पष्टीकरण

sakal_logo
By
ओमकार वाबळे

मागील काही वर्षांपासून आर्थिक संघर्षात अडकलेली एअर इंडिया कंपनी लिलावात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी मालकीच्या या विमान कंपनीची खासगीकरणाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून डिसेंबरपर्यंत कंपनीला नवा मालक मिळण्याचे संकेत मिळत आहेत. लिलावाच्या प्रक्रियेनंतर आता एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची स्थापना करण्यात आली होती. हे पॅनल लवकरच एअर इंडियाच्या लिलावातील बोली मंजूर करण्यासाठी बैठक घेणार आहे. एअर इंडिया कंपनीतील सरकारी निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला वेग देण्याचे काम सुरू आहे. सरकारला येत्या डिसेंबरपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून कंपनी नव्या मालकाच्या हवाली करायची आहे. गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या बैठकीनंतर याबाबत औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. आत्तापर्यंत, टाटा समूहाने सर्वाधिक बोली लावत लिलावात प्रमुख दावेदारी ठेवली आहे. असे झाल्यास, एअर इंडिया 67 वर्षांनंतर पुन्हा एखाद्या मालकाच्या हाती येईल.

मात्र भारत सरकराच्या वतीने या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रकरणात भारत सरकारने आर्थिक बोलींना मंजूरी दिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दिल्या जात आहेत. मात्र हे मीडिया रिपोर्ट चुकीचे आहेत, असे स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आले आहेत. केंद्र सरकार निर्णय कधी घेणार, याबद्दल माध्यमांना माहिती दिली जाईल, असेही सांगण्यात आले.

‘ब्‍लूमबर्ग टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, या विमान कंपनीच्या मालकीसाठी प्रचंड प्रमाणात पैसा ओतण्‍याची आणि त्यात सुधारणा करण्याची क्षमता देशातील ‘टाटा ग्रुप’ या देशातील सर्वांत मोठ्या या समूहात आहे, हे लक्षात घेऊन सरकार ‘एअर इंडिया लिमिटेड’चा ताबा त्यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. एअर इंडियाबद्दल ‘टाटां’ना ममत्व आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधत ‘एअर इंडिया ही माझी निर्मिती असून टाटा समूहातील अन्य कंपन्यांच्या त्यांच्याकडे चालून आल्या आहेत आणि मी त्यांचे फक्त व्यवस्थापन पाहतो,’ असे जेआरडी म्हणत असत, अशी आठवण भार्गव यांनी सांगितली. यामुळेच टाटा व एअर इंडियात भावनिक नाते असून त्यांना या कंपनीबद्दल जिव्हाळा आहे. यातून त्यांनी या लिलावात भाग घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. जेआरडी हे भारतातील पहिले परवानाधारक वैमानिक होते.

loading image
go to top