एअर इंडियाच्या सीईओपदी Ilker Ayci; टाटा सन्सने केली घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एअर इंडियाच्या सीईओपदी Ilker Ayci; टाटा सन्सने केली घोषणा

एअर इंडियाच्या सीईओपदी Ilker Ayci; टाटा सन्सने केली घोषणा

नवी दिल्ली : एअर इंडियामध्ये (Air India) बदलांना सुरुवात झाली आहे. टाटा ग्रुपने (Tata Group) सर्वांत आधी एअर इंडियाच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेच पहिले पाऊल म्हणून आता टर्किश एअरलाईनचे माजी चेअरमन इलकर आयशी (Ilker Ayci) यांना एअर इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्ट आणि सीईओपदी बसवण्यात आलं आहे.

टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बोर्डाच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 51 वर्षांचे इलकर आयशी हे टर्कीचे उद्योगपती आहेत. त्यांना 2015 साली टर्किश एअरलाईन्सच्या चेअरमनपदी बसवण्यात आलं होतं. 26 जानेवारी 2022 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांना आता एअर इंडियाची कमान सांभाळण्याची जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे.