Tata Sons: एन चंद्रशेकरनच राहणार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Sons: एन चंद्रशेकरनच राहणार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष

Tata Sons: एन चंद्रशेकरनच राहणार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष

मुंबई: टाटा सन्स बोर्डाने पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्षाच्या रुपात एन. चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी आयोजित केलेल्या एका बैठकीदरम्यान गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेत त्यांचीच कारकिर्द आणखी पाच वर्षांनी वाढवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. (Tata Sons N Chandrasekaran)

टाटा सन्सच्या या बोर्डाच्या मीटिंगमध्ये टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा देखील उपस्थित होते. त्यांनी एन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रूपच्या प्रगती आणि प्रदर्शनावर समाधान व्यक्त केलं. रतन टाटा यांच्यासहित बोर्डाच्या इतर सदस्यांनी देखील एन चंद्रशेखरन यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचं कौतुक करत पुढील पाच वर्षांसाठी त्यांची पुनर्नियुक्ती करण्याचं एकमताने मान्य केलंय.

Web Title: Tata Sons Board Renews N Chandrasekaran Term As Executive Chairman For The Next Five Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..