पाठीवर लाकूड फुटेपर्यंत विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Crime News

पाच वर्षांच्या निष्पाप विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केलीय.

पाठीवर लाकूड फुटेपर्यंत विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा (Bihar Patna) इथं पाच वर्षांच्या निष्पाप विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणारा शिक्षक अमरकांत कुमार उर्फ ​​कृष्णा ​(छोटू) सर याला पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवलंय. शिक्षकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाटणा पोलिसांनी त्याची स्वतःहून दखल घेऊन कारवाई केलीय.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन (National Commission for the Protection of Children) यांच्या सूचनेनंतर, पोलिसांनी एफआयआर नोंदवून कारवाई केलीय. गुन्हा दाखल झाल्यानंतर, आरोपी अमरकांत कुमार हा नालंदा जिल्ह्यातील तेल्हाडा पोलीस स्टेशन परिसरात काका मनोज कुमार यांच्या घरी लपला होता, तिथून पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली. आयपीसी व्यतिरिक्त, जस्टिस ज्युवेनाईल अॅक्टच्या (Justice Juvenile Act) कलमाखाली अमरकांतविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आलाय.

हेही वाचा: चिमुरड्याच्या पाठीवर लाकूड तुटलं तरी शिक्षकाचा राग शांत झाला नाही, तो मारतंच राहिला!

पाटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मानवजीत सिंह धिल्लन यांनी कारवाईची माहिती दिलीय. त्यांनी सांगितलं की, आरोपी अमरकांत हा मूळचा जेहानाबाद जिल्ह्यामधील घोसी पोलीस स्टेशन हद्दीतील मंडई गावचा रहिवासी आहे. अमरकांत हा धनरुवा पोलीस स्टेशन हद्दीतील बीर ओय्यारा महादेव जागेमध्ये जया पब्लिक स्कूल चालवत होता. या शाळेचा तो प्राचार्यही आहे. इथं तो एक कोचिंग सेंटरही चालवत होता. दरम्यान, त्याच्यावर कडक कारवाई करत पोलिसांनी शाळेतील सर्व संगणक, फर्निचर आणि कागदपत्रं जप्त केली आहेत.

Web Title: Teacher Amarkant Kumar Accused Of Badly Thrashing 5 Year Old Child Arrested By Patna Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..