जोधपूर : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार; शिक्षकाला अटक | Jodhpur crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape case
जोधपूर : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार; शिक्षकाला अटक

जोधपूर : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार; शिक्षकाला अटक

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये (Jodhpur) धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शाळेतील शिक्षकाने त्याच्या दोन सहकाऱ्यांसह अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार (Gang rape) केला. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक (teacher arrested) केलीय. सत्य प्रकाश असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. ही घटना मटोरा पोलीस हद्दीतील ओसेनमधील पुनासर येथे घडली. प्रकाशच्या सहकाऱ्यानी पीडित मुलीचं गुरुवारी अपहरण केलं होतं. पीडितीच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता, अर्ध बेशुद्ध अवस्थेत ती शिक्षकाच्या घरी सापडली. (Teacher and two others gang rape eleven class student in jodhpur)

हेही वाचा: 'मन झालं बाजिंद' मालिकेतील अभिनेत्रीला लागला शॉक?

"मागिल तीन वर्षांपासून आरोपी माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचा आणि झालेला प्रकार कुणालाही न सांगण्यासाठी मला धमक्या द्यायचा." अशी माहिती पीडितेनं तिच्या जबाबात दिली आहे. " पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही या गंभीर प्रकरणी आरोपी प्रकाश आणि इतर दोघांवर सामुहिक बलात्कार आणि अपहरण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. आरोपी शिक्षक सत्य प्रकाशला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे. अशी माहिती ओसेनचे पोलीस अधिकारी नूर मोहम्मद यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, पीडित मुलगी काही कामा निमित्ता गुरुवारी दुपारी शेजारच्या फार्ममध्ये गेली होती. मात्र ती सायंकाळी घरी परतलीच नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी तिची शोधाशोध केली. शुक्रवारी गावातील लोकांना सत्य प्रकाशच्या घरातून पीडित मुलीच्या किंचाळ्या ऐकू आल्या त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्या कुटुंबियांना याबाबत कळवलं. त्यानंतर पीडितेच्या कुटुबियांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पीडित मुलीला शिक्षक प्रकाशने त्याच्या घरातील बाथरुम मध्ये कोंडून ठेवलं होतं. पीडितेच्या सुटका केल्यानंतर तिने झालेल्या गंभीर प्रकाराबाब त तिच्या कुटुंबियांना सांगितलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jodhpurcrime update
loading image
go to top