esakal | सचिन पायलट यांच्यासोबत किती आमदार? थेट व्हिडिओ प्रसिद्ध करत दिले उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Team Sachin Pilot Releases Video Of Rajasthan MLAs Supporting Him

सचिन पायलट यांच्यासोबत किती आमदार आहेत याचे उत्तर त्यांच्या टीमने थेट एक व्हिडीओ प्रसिद्ध करुनच दिले आहे. या व्हिडिओमध्ये १५ आमदार त्यांच्यासोबत बसले असल्याचं दिसत आहेत. 

सचिन पायलट यांच्यासोबत किती आमदार? थेट व्हिडिओ प्रसिद्ध करत दिले उत्तर

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

नवी दिल्ली : राजस्थानमधील सत्तासंघर्ष काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अशोक गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचे संकट अद्यापही कायम असून काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १०० आमदारांसह शक्तीप्रदर्शन केलं. पण, वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करुनही  सचिन पायलट यांनी बंडाचा पवित्रा कायम ठेवला आहे. यादरम्यान सचिन पायलट यांच्यासोबत किती आमदार आहेत याचे उत्तर त्यांच्या टीमने थेट एक व्हिडीओ प्रसिद्ध करुनच दिले आहे. या व्हिडिओमध्ये १५ आमदार त्यांच्यासोबत बसले असल्याचं दिसत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सचिन पायलट यांनी त्यांच्याकडे ३० आमदार असल्याचा दावा केला होता. हा १० सेकंदाचा व्हिडीओ असून सचिन पायलट यांच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकण्यात आला. या व्हिडीओत सचिन पायलट दिसत नसले तरी १६ आमदार एकत्र बसल्याचं दिसत आहे. व्हिडीओत अन्य ६ लोकही आहेत त्यांची ओळख पटली नाही. व्हिडीओत आमदार इंद्रराज गुर्जर, मुकेश भाकर, हरीश मीणा दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी फॅमिली असा उल्लेख केला आहे.

मुकेश भाकर यांनी सांगितले की, काँग्रेसशी प्रामाणिकपणा याचा अर्थ अशोक गहलोत यांची गुलामी आहे, हे आम्ही सहन करणार नाही. काही अपक्ष आमदारही सचिन पायलट यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा दावा फेटाळत जर सरकारकडे बहुमतात असेल तर त्यांनी सभागृहात ते सिद्ध करावं. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नाही असं सचिन पायलट यांच्या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे.

राजस्थानमधील पक्षीय बलाबल 
एकूण सदस्य-    २००

काँग्रेस        -     १०७
भाजप         -     ७२
अपक्ष         -     १३
इतर पक्ष     -      ८