
नवी दिल्ली : ‘‘न्यायिक निर्णय प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान हे पूरक असावे त्याने मानवी मेंदूची जागा घेता कामा नये, विवेक, करुणा आणि न्यायिक विश्लेषण या बाबी कधीच कालबाह्य ठरू शकत नाहीत,’’ असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. ‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’मधील ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ येथे ‘भारतीय न्यायिक व्यवस्थेमधील तंत्रज्ञानाची भूमिका’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.