PUBG गेम खेळू न दिल्यामुळं पोटच्या पोरानं आईची केली गोळ्या झाडून हत्या I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Pradesh Crime News

राजधानी लखनौच्या पीजीआय परिसरात हत्येची खळबळजनक घटना समोर आलीय.

PUBG गेम खेळू न दिल्यामुळं पोटच्या पोरानं आईची केली गोळ्या झाडून हत्या

लखनौ : राजधानी लखनौच्या (Lucknow) पीजीआय परिसरात हत्येची खळबळजनक घटना समोर आलीय. इथं एका अल्पवयीन मुलानं आपल्या आईला PUBG गेम खेळण्यापासून रोखल्यामुळं गोळ्या झाडून ठार केलंय. एडीसीपी ईस्ट कासिम अब्दी यांनी सांगितलं की, पीजीआय पोलिस स्टेशन (PGI Police Station) परिसरातील एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तिथं पोहोचले. तेव्हा खोलीत साधना सिंह या 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ पिस्तुलही पडलेलं होतं.

पोलिसांनी मृताच्या (साधना सिंह) 16 वर्षीय मुलाची चौकशी केली असता त्यानं सांगितलं की, घरात इलेक्ट्रिकल काम करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीनं आईची हत्या केलीय. मृताच्या 10 वर्षीय मुलीला विश्वासात घेऊन पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. मृत साधना हिचा पती सैन्यात जेसीओ असून तो सध्या आसनसोल पश्चिम बंगालमध्ये तैनात आहे. साधना तिच्या 16 वर्षांच्या मुलासह आणि 10 वर्षांच्या मुलीसोबत पीजीआय परिसरात राहत होती. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलंय.

हेही वाचा: RSS नं गावोगावी जाऊन गोळा केल्या 'चड्ड्या'; काँग्रेसविरोधात सुरु केली 'ही' मोहीम

एडीसीपी कासिम अब्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाला मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाचं व्यसन लागलं होतं. आई साधना त्याला सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर राहण्यास सांगायची. रविवारीही आईनं मुलाला मोबाईलवर PUBG खेळल्याबद्दल खडसावलं होतं, त्यामुळं रागाच्या भरात मुलानं ही घटना घडवली. रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास साधना झोपली, तेव्हा मुलानं वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तुलानं आईवर गोळी झाडली आणि 10 वर्षांच्या बहिणीला धमकावलं.

Web Title: Teenager Shot And Killed His Mother After Refusing To Play Game On Mobile In Lucknow Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top