
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अर्थात ‘आरजेडी’चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव अपक्ष निवडणूक लढविणार असून, नवा राजकीय पक्ष काढण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. सध्या ‘टीम तेजप्रताप’ नावाने ते आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवणार आहेत. ‘आरजेडी’तून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी वैशाली महुआतून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा तेजप्रताप यांनी शनिवारी (ता. २६) केली आहे.