Mohan Bhagwat : भागवतांनी बोलायला उशीर केला; मणिपूरसंदर्भात विरोधी पक्षांच्या नेत्यांचा टोला

सरसंघचालक डॉ. भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना मणिपूर जळत असताना तेथील हिंसा नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, असे मत व्यक्त केले आहे.
Tejashwi Yadav on Mohan Bhagwat remark on Manipur violence marathi news
Tejashwi Yadav on Mohan Bhagwat remark on Manipur violence marathi news

नवी दिल्ली, ता. ११ ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मणिपूरच्या हिंसेच्या संदर्भात सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मात्र डॉ. मोहन भागवत यांनी या संदर्भात मत व्यक्त करायला खूप उशिर केला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सरसंघचालक डॉ. भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना मणिपूर जळत असताना तेथील हिंसा नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, असे मत व्यक्त केले आहे. हा इशारा केंद्र सरकारकडे व विशेषतः पंतप्रधान मोदी यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

Tejashwi Yadav on Mohan Bhagwat remark on Manipur violence marathi news
Rajya Sabha Election : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेच्या दहा जागा रिक्त! महाराष्ट्रातील दोन तर भाजपच्या सात जगांचा समावेश

हिंसाचारानंतर पंतप्रधान मोदी यांनी एकदाही मणिपूरला भेट दिलेली नाही. सत्तेचा अहंकार नको, अशा शब्दांत त्यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. यावर विरोधी पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी डॉ. भागवत यांनी आपले मत व्यक्त करायला बराच उशीर केल्याचे म्हटले आहे.

मणिपूर येथील हिंसाचार सुरू असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्याचे नेमके कारण काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचे नेते खासदार गौरव गोगोई यांनी मणिपूरच्या हिंसाचाराकडे पंतप्रधान मोदी लक्ष देतील, हे अपेक्षित नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या वक्तव्याकडे लक्ष देतील, असेही वाटत नाही. राज्यघटनेचा सोयीप्रमाणे अर्थ लावण्यासाठी व तपास संस्थांचा दुरुपयोग करताना ते मणिपूरच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करतील. परंतु मणिपूरच्या जनतेच्यावतीने ‘इंडिया’ आघाडीचे नेते बोलतील तसेच संसद व राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत राहतील, असेही गोगोई यांनी म्हटले आहे.

Tejashwi Yadav on Mohan Bhagwat remark on Manipur violence marathi news
Delhi Canada Flight: करत होता गंमत पण आलं अंगलट! विमान उडवण्याची दिली धमकी अन् 12 तास...;13 वर्षाच्या मुलाचा प्रताप आला समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com