भाजपने हनुमानाच्या बंगल्यालाच आग लावली"; तेजस्वी यादव यांचा टोला

tejashwi yadav slams bjp over chirag paswan eviction from janpath bungalow
tejashwi yadav slams bjp over chirag paswan eviction from janpath bungalow

लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) खासदार चिराग पासवान यांना दिल्लीतील 12 जनपथ बंगल्यातून बाहेर काढल्याप्रकरणी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "रामविलास पासवान शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्या पाठीशी उभे राहिले. पण भाजपने 'हनुमान'च्या बंगल्यालाच आग लावली. भाजपला पाठिंबा दिल्याचा हा परिणाम आहे. त्यांनी यापूर्वीच भाजपने पक्ष फोडला आहे. पक्ष आणि नेत्यांना वेगळे केलं." असे ते म्हणाले आहेत.

भाजपच्या यूपी मॉडेलबद्दल विचारले असता, यादव म्हणाले की, "बिहारमधील लोकांनी त्यांचे सर्कस मॉडेल पाहिले आहे. यूपी मॉडेल अद्याप समजले नाही. जर बुलडोझर चालवणे हे यूपी मॉडेल आहे, तर ते बेरोजगारीवर बुलडोझर का चालवत नाहीत? योगीजींनी बेरोजगारी, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारावरही बुलडोझर चालवला पाहिजे.

बंगल्यातून बाहेर पडण्याच्या नोटीसनंतर काही महिन्यांनंतर, एलजेपी खासदार चिराग पासवान यांनी बुधवारी 12 जनपथ बंगला रिकामा केला, जो त्यांच्या नंतर वडील आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना देण्यात आला होता. दिवंगत रामविलास पासवान यांना देण्यात आलेला बंगला रिकामा करण्याच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आणि लोकसभा खासदार चिराग पासवान हे बंगल्यात राहत होते.

tejashwi yadav slams bjp over chirag paswan eviction from janpath bungalow
इन्फोसिसचा मोठा निर्णण; रशियातील सर्व कार्यालये करणार बंद

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेदखल करण्याचे आदेश गेल्या वर्षी इस्टेट संचालनालयाने (DOE) जारी केले होते, अनेक स्मरणपत्रे पाठवली होती. रामविलास पासवान हे यूपीए आणि एनडीए या दोन्ही सरकारांमध्ये केंद्रीय मंत्री होते आणि बराच काळ बंगल्यात राहत होते. हा बंगला एलजेपीच्या राजकीय हालचालींचे केंद्र ठरत होता आणि रामविलास पासवान नियमित पत्रकार परिषदा घेत असत. 12 जनपथच्या मुख्य गेटसमोर रामविलास पासवान यांचा पुतळाही बसवण्यात आला आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये रामविलास पासवान यांच्या निधनानंतर हा बंगला केंद्रीय रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये देण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिराग पासवान यांना आधीच खासदारांसाठी राखीव असलेला फ्लॅट देण्यात आला आहे.

tejashwi yadav slams bjp over chirag paswan eviction from janpath bungalow
पाकिस्तानचे अमेरिकेशी घनिष्ठ संबंध; लष्करप्रमुख बाजवांचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com