
Tejashwi Yadav
sakal
पाटणा : ‘‘मी जिवंत आहे तोपर्यंत भाजपविरुद्धची लढाई सुरूच ठेवणार,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय जनता दलाचे(आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी केले. त्याचप्रमाणे तेजस्वी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली. ‘मी खरा बिहारी आहे, त्यामुळे बाहेरून आलेल्यांना मी घाबरत नाही,’ असे तेजस्वी म्हणाले.