Telangana Assembly Elections: कोण कुणाची बी टीम? सत्तेत येण्यासाठी कुणाची होणार युती? जाणून घ्या तेलंगणाची चौरंगी लढत

Telangana Assembly Elections
Telangana Assembly Elections

Telangana Assembly Elections 2023:  तेलंगणात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार मंगळवारी सायंकाळी 5 वाजता संपला. मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये मतदान झाले आहे. तेलंगणातील मतदानाबरोबरच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडतील आणि मग फक्त प्रतीक्षा निकालाची आहे. 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.  

निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. तेलंगणाबद्दल बोलायचे झाले तर, येथे बीआरएस सलग तिसऱ्यांदा सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस सर्व शक्तीनिशी लढत आहे आणि पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि भाजप देखील सत्तेत येण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. AIMIM देखील राज्यात ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तेलंगणातील 4 पक्षांचे राजकारण 4 मुद्द्यांवर समजून घेण्याचा प्रयत्न करुया.

बीआरएसचा सलग तिसऱ्यांदा सत्ता टिकवण्याचा प्रयत्न -

119 सदस्यीय विधानसभेत बहुमताचा जादुई आकडा 60 आहे. केसीआरचे सरकार 9 वर्षे चालू राहिले. 2014 मध्ये तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर दोनदा निवडणुका झाल्या आणि दोन्ही निवडणुकांमध्ये KCR यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने (TRS) जिंकल्या. 2018 च्या दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत तर TRS समोर विरोधी नेते देखील दिसले नाहीत.

2022 मध्ये के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या TRS पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) असे केले. पक्षाचे नाव बदलल्यानंतर बीआरएसची ही पहिलीच निवडणूक लढत आहे. मात्र, पक्षाचे निवडणूक चिन्ह जुनेच आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसला काँग्रेस आणि भाजपकडून कडवी स्पर्धा मिळत आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात अजिंक्य मानला जाणारा तेलंगणा तिरंगी लढतीत अडकल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

तेलंगणाच्या विद्यमान बीआरएस सरकारमध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह एकूण 18 मंत्री आहेत. यापैकी तीन मंत्री विधान परिषदेचे सदस्य म्हणून सरकारमधील मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे दोन जागांवर (गजवेल आणि कामारेड्डी) निवडणूक लढवत आहेत. यावेळी फक्त एकच मंत्री बीआरएसमधून निवडणूक लढवत नाहीये. 2018 मध्ये मलकाजगिरी जागेवरून आमदार म्हणून निवडून आलेले एम. हनुमंत राव गेल्या महिन्यापर्यंत BRS चा भाग होते. ते मेडक मतदारसंघातून आपल्या मुलासाठी तिकीट मागत होते, परंतु बीआरएसने तेथे दुसरा उमेदवार उभा केला.

यानंतर हनुमंत राव यांनी बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार बनले. बीआरएसने आता मंत्री मल्ला रेड्डी यांची सून मेरी राजशेखर रेड्डी यांना मलकाजगिरी जागेवर तिकीट दिले आहे. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि माजी आमदार एन. रामचंदर राव यांना उमेदवारी दिली आहे.

Telangana Assembly Elections
Chhagan Bhujbal: मराठा समाजाने लासलगावमध्ये भुजबळांचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत 'गो बॅक'च्या दिल्या घोषणा

भाजप सत्तेत येण्यासाठी शर्यतीत-

भाजप तेलंगणात केसीआर यांना तगडी फाईट देत आहे. भाजप मित्रपक्ष जनसेवा पक्षासोबत ११९ जागांवर निवडणूव लढवत आहे. भाजपने तीन खासदारांनी निवडणुकीत उतरवले आहे. भाजपने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील अनेक खासदारांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवले आहे. तसेच राज्यातील भाजपचे एकमेव आमदार टी राजा सिंह यांनाही तिकीट मिळाले आहे. ऑगस्ट 2022 मध्ये पक्षाने त्यांना निलंबित केले होते. त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. 2018 मध्ये तेलंगणात भाजपला फक्त 1 जागा मिळाली होती. तर काँग्रेसला 19 आणि बिआरएसने 88 जागा मिळवल्या होत्या.

3 विद्यमान खासदारांना तिकीट,  काँग्रेसची तगडी फाईट-

काँग्रेसने तेलंगणात 119 पैकी 118 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तीन खासदारांना देखील काँग्रेसने तिकीट दिले आहे. काँग्रेस तेलंगणात जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे तेलंगणाचे मतदार काँग्रेसला संधी देणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. त्रिशूंक निवडणूक झाली तर काँग्रेस आणि बीआरएस यांच्या युतीची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केसीआर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र सत्तेसाठी आणि केंद्रात ताकद वाढवण्यासाठी केसीआर भाजपसोबत देखील हातमिळवणी करु शकतात, असा अंदाज देखील व्यक्त करण्यात येत आहे.

AIMIM चा बीआरएसला पाठिंबा-

तेलंगणात AIMIM फक्त 9 जागांवर निवडणूर लढलत आहे. AIMIM चा गड फक्त हैद्राबाद आहे. इतर जागांवर AIMIM ने बीआरएसला पाठिंबा दिला आहे. 

Telangana Assembly Elections
5 राज्यांच्या निवडणुकीतील 1,452 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी; 2,371 करोडपती, 22 जणांवर खुनाचे तर 82 जणांवर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com