परदेशात शिकायला गेलेल्या भाजप नेत्याचा मुलगा बेपत्ता!

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

परदेशात शिकायला गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मुलगा बेपत्त झाला आहे. युनाइटेड किंगड्मला अभ्यासासाठी गेलेला भाजप नेत्याचा मुलगा बेपत्ता झाला आहे. उज्ज्वल श्रीहर्षा असं बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव आहे. उज्ज्वल हा भाजप नेते उदय प्रताप यांचा मुलगा आहे. उदय प्रताप हे तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहे.

हैदराबाद : परदेशात शिकायला गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मुलगा बेपत्त झाला आहे. युनाइटेड किंगड्मला अभ्यासासाठी गेलेला भाजप नेत्याचा मुलगा बेपत्ता झाला आहे. उज्ज्वल श्रीहर्षा असं बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव आहे. उज्ज्वल हा भाजप नेते उदय प्रताप यांचा मुलगा आहे. उदय प्रताप हे तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहे.

शुक्रवारी (ता. 23) ऑगस्ट लंडन पोलिसांनी उज्ज्वल बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या वडीलांना दिली. त्यावेळी लंडन पोलिसांनी उज्ज्वलची बॅग लंडनच्या एका समुद्रकिनाऱ्यावर आढळली असल्याचेही सांगितले आहे. उज्ज्वल हा गेल्यावर्षी युकेमध्ये मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजेंस यात एम.एस. करण्यासाठी गेला होता. त्याने 21 ऑगस्टला आपल्या आईला शेवटचा फोन केला. उज्ज्वल हा घरी नियमित फोन करायचा. मात्र 22 ऑगस्टला मुलाचा फोन न आल्यानं त्याच्या वडीलांनी त्याला फोन केला. मात्र उज्ज्वलने त्यांचा फोन उचलला नाही.

उज्ज्वल याला वैज्ञानिक होण्याची इच्छा होती. नुकतंच तो एका प्रोजेक्टसाठी जपानमध्ये गेला होता. दरम्यान, केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या प्रकरणात संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Telangana BJP leader’s son goes missing in London