TRS : मोदींना टक्कर देण्यासाठी KCR यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री; दसऱ्याला करणार राष्ट्रीय पक्षाची घोषणा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Telangana CM K Chandrasekhar Rao

पक्षाचं नाव बदलण्यासाठी टीआरएस पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार आहे.

TRS : मोदींना टक्कर देण्यासाठी KCR यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrasekhar Rao) लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची (National Party) घोषणा करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या (Dussehra 2022) मुहूर्तावर सीएम केसीआर आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या नावाची घोषणा करतील, असं मानलं जात आहे.

विजयादशमी दिवशी 5 ऑक्टोबरला हैदराबाद तेलंगणा भवनमध्ये (Hyderabad Telangana Bhavan) टीआरएस (TRS) पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. एएनआयच्या वृत्तानुसार, सीएम केसीआर हैदराबादच्या बैठकीनंतर राष्ट्रीय राजकारणाबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल बोलू शकतात. पक्षाचं नाव बदलण्यासाठी टीआरएस पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार असल्याचंही मानलं जात आहे.

हेही वाचा: Shiv Sena : दसरा मेळाव्याआधी शिवसेनेला पडणार मोठं खिंडार; 4 आमदारांसह 3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात?

केसीआर 9 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय राजधानीत जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. टीआरएस नेते श्रीधर रेड्डी म्हणाले, "देशातील लोक एक मजबूत आणि चांगलं नेतृत्व शोधत आहेत. कारण, एनडीए सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे." तर, दुसरीकडं तेलंगणा पीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष आणि माजी खासदार मधू गौड यास्की म्हणाले, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्यात काही अर्थ नाही. त्यांनी तेलंगणातील जनतेचा विश्वासघात केलाय आणि आता ते देशाच्या जनतेचा विश्वासघात करू इच्छित आहेत, अशी त्यांनी टीका केलीय.

हेही वाचा: North Korea : किम जोंग उनच्या देशानं टोकियोवर डागलं क्षेपणास्त्र; जपान नागरिकांत घबराट