हैदराबादमधील औषध फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट; 8 जण जखमी

वृत्तसंस्था
Saturday, 12 December 2020

तेलंगनाची राजधानी हैदराबादच्या (Hyderabad) एका औषध फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला.

हैदराबाद- तेलंगनाची राजधानी हैदराबादच्या (Hyderabad) एका औषध फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला. यामुळे फॅक्टरीला आग लागली असून यात किमान आठ व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. विंध्या ऑर्गेनिक्सची हे औषध युनिट संगारेड्डी जिल्ह्यातील बोलारम औद्योगिक क्षेत्रामध्ये येते. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका व्यक्तीने शूट केलेल्या व्हिडिओत फॅक्टरीमधून धूर निघत असल्याचं दिसत आहे. ही घटना दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार आग नियंत्रणात आली आहे. फॅक्टरीला आग लागली असली तरी परिसरात गॅस गळतीचा धोका नाही. या स्फोटामुळे किती नुकसान झाले, हे अजून कळू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार एका सॉल्वेंटला रिअॅक्शनसाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यात आग लागली. अग्निशमन दल घडनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Telangana Eight people injured in a massive fire Bollaram of Hyderabad