
हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय.
कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपीमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश
हैदराबाद : तेलंगणाची (Telangana) राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेत अनेक हायप्रोफाईल नावांचाही सहभाग असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीय. हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये ही घटना घडलीय.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या गँगरेप घटनेत चार जणांचा समावेश आहे. आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असून तो एका आमदाराचा मुलगा आहे. पीडितेच्या वडिलांतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Hyderabad Police) या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. ही घटना शनिवारी घडल्याचं सांगण्यात येतंय.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, एका आमदाराचा मुलगा आणि अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष एका पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी पीडित तरूणीला एका मित्रानं पार्टीत बोलावलं होतं. सूत्रांनुसार, पार्टीत पीडित तरूणीसोबत आमदाराचा मुलगाही होता. पीडिता केवळ एका आरोपीची ओळख पटवू शकली. हा आरोपी अल्पवयीन आहे. पोलिसांनी तपासानंतर आयपीसी कलम ३५४, ३२३, ९, १० आणि पॉस्को कायद्यातंर्गत ३ जणांवर गुन्हा नोंदवलाय. १७ वर्षीय पीडित तरूणीची मेडिकल तपासणी केल्यानंतर पोलिसांनी कलम ३७६ ही गुन्ह्यात दाखल केले.
पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलंय की, २८ मे रोजी त्यांची मुलगी एका पार्टीत गेली होती. तिचा मित्र सूरज आणि हादीनं पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यात तिला बोलवण्यात आलं होतं. सायंकाळी पाचच्या सुमारास लाल रंगाच्या मर्सिडिज कारमधून काही लोकांसोबत ती बाहेर पडली. यावेळी कारमध्ये असणाऱ्यांनी माझ्या मुलीवर अत्याचार केला. माझ्या मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी तिच्या वडिलांनी केलीय.
Web Title: Telangana Hyderabad Gangrape With Minor Girl In Mercedes Car
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..