Crime News : मित्राने व्हायरल केले खासगी फोटो; विद्यार्थिनीची आत्महत्या | Telangana Student Dies By Suicide After Friend Leaks Her Personal Pics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girl suicide
Crime News : मित्राने व्हायरल केले खासगी फोटो; विद्यार्थिनीची आत्महत्या

Crime News : मित्राने व्हायरल केले खासगी फोटो; विद्यार्थिनीची आत्महत्या

मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच तेलंगणमधल्या वारंगळमध्ये आणखी एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. मित्राने तिचे काही खासगी फोटो इतरांना पाठवल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या विद्यार्थिनीची ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलासोबत मैत्री होती. या मुलांचं तिच्यावर प्रेम होतं. मात्र काही काळानंतर ती तिच्यासोबत इंजिनीअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत जास्त वेळ घालवू लागली.

त्यानंतर तिच्यात आणि तिच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रामध्ये वाद झाले. या वादातूनच त्याने तिचे काही खासगी फोटो तिच्या इतर मित्रांना पाठवले. या घडल्या प्रकारामुळे या मुलीला नैराश्य आलं आणि तिने आपल्या एका नातेवाईकाच्या घरी स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.

दोन पुरुषांनी तिला त्रास दिला, त्यातून तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप या मुलीच्या पालकांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी याच भागतल्या एका मेडिकलच्या विद्यार्थिनीने आपल्या सिनीअर्सच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.

टॅग्स :attempt to suicide