'ऑनर किलिंग'प्रकरणी दहा जण दोषी

पीटीआय
Friday, 23 August 2019

केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील एका दलित युवकाच्या हत्येप्रकरणी स्थानिक न्यायालयाने दहा जणांना दोषी ठरविले आहे. दलित- ख्रिश्‍चन युवक केव्हिन पी. जोसेफ (वय 23) याची 2018 मध्ये हत्या झाली होती. ही हत्या त्याच्या पत्नीच्या नातेवाइकांनी घडवून आणली. हा प्रकार "ऑनर किलिंग'चा असल्याचे सांगितले जात आहे. दोषींत केव्हिन याच्या मेहुण्याचा समावेश आहे, तर सबळ पुराव्याअभावी केव्हिनच्या सासऱ्यासह चौघांना न्यायालयाने दोषमुक्त ठरविले.

कोट्टायाम (केरळ) - केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील एका दलित युवकाच्या हत्येप्रकरणी स्थानिक न्यायालयाने दहा जणांना दोषी ठरविले आहे. दलित- ख्रिश्‍चन युवक केव्हिन पी. जोसेफ (वय 23) याची 2018 मध्ये हत्या झाली होती. ही हत्या त्याच्या पत्नीच्या नातेवाइकांनी घडवून आणली. हा प्रकार "ऑनर किलिंग'चा असल्याचे सांगितले जात आहे. दोषींत केव्हिन याच्या मेहुण्याचा समावेश आहे, तर सबळ पुराव्याअभावी केव्हिनच्या सासऱ्यासह चौघांना न्यायालयाने दोषमुक्त ठरविले.

मुख्य न्यायधीश सी. एस. जयचंद्रन यांनी या खटल्याची पुढील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी निश्‍चित केली असून, दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. या खटल्यात दहाही जण विविध कलमान्वये दोषी ठरविल्याची माहिती सरकारी वकील सी. एस. अजयन यांनी दिली. एकूण चौदा आरोपी होते. केव्हिनचा मेहुणा सानू हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असून सासरा चाको हा पाचवा आरोपी होता.

केव्हिन आणि निनू यांनी कुटुंबाचा विरोध पत्करून इत्तूमनूर येथील नोंदणी कार्यालयात विवाह केला होता. मात्र कोल्लम जिल्ह्यातील चालियाक्करा येथे 28 मे रोजी केव्हिनचा मृतदेह आढळून आला.

याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी या खटल्याचे कामकाज सुरू झाले, तेव्हा ही हत्या ऑनर किलिंगच्या प्रकारातून घडल्याचा आरोप केव्हिनच्या कुटुंबीयांनी केला. केव्हिनच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार तिचे वडील चाको हे विवाहाच्या विरोधात होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten convicted for honor killings