भंडाऱ्यात ह्रदय हेलावून टाकणारी घटना; PM मोदींसह राहुल गांधींकडून कुटुंबियांचे सांत्वन

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

ज्या नवजात बालकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहे, असे मोदींनी म्हटले आहे. या घटनेत जे गंभीर जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.   

Ten newborn babies die in fire at Bhandara : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात अर्भकांच्या दुर्देवीरित्या मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याघटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील भंडारा येथील घटना ही ह्रद्य पिळवटून टाकणारी आहे. ज्या नवजात बालकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहे, असे मोदींनी म्हटले आहे. या घटनेत जे गंभीर जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.   

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी देखील या घटनेसंदर्भात ट्विट केले आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेली घटना ही दुर्देवी आहे.  नवजात बालकांच्या कुटुंबियांसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten newborn babies die in fire at Bhandara PM Modi says Heart wrenching tragedy