इंफाळ : मणिपूरमध्ये चुराचांदपूर जिल्ह्यात हमार आणि जोमी समुदायांत दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता तर एकजण जखमी झाला होता. त्यानंतर चुराचांदपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून गुरुवारीही तणाव कायम होता..जिल्ह्यातील शाळा व दुकाने बंद असून सिव्हिल सोसायटीसह चर्चमधील नेते आणि सिव्हिल सोसायटी गट शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मंगळवारी (ता. १८) रात्री हमार आणि जोमी समुदायांत झालेल्या संघर्षात हमार समुदायातील लालरोपुई पाखुआंगटे (वय ५१) यांचा गोळीबारात मृत्यू झाला..हमार समुदायाचे सरचिटणीस रिचर्ड हमार यांच्यावर जोमी समुदायातील काही जणांनी रविवारी (ता.१६) हल्ला केला होता. त्यानंतर सोमवारी (ता. १७) दुसऱ्या दिवशी या दोन गटांत हिंसाचाराला सुरुवात झाली. त्यानंतर संचारबंदीही लागू करण्यात आली..दरम्यान, चुराचांदपूरमध्ये झालेल्या या हिंसाचारामुळे मदत छावण्यांत असलेल्या कुकी समुदायातील अनेक विस्थापितांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. चुराचांदपूर शहरात प्रामुख्याने जोमी समुदायातील लोक राहतात. काही भागांत हमार, कुकी समुदायाचीही वस्ती आहे. मणिपूरमध्ये मे २०२३ पासून वांशिक हिंसाचारात २५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे..Lok Sabha : खासदारांच्या टी-शर्टमुळे कामकाज ठप्प; प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेवरून लोकसभेत ‘द्रमुक’ आक्रमक.आदिवासी संघटनांचे आवाहनचुराचांदपूर जिल्ह्यातील तणाव निवळण्यासाठी आमदार आणि आदिवासी संघटनांनी स्वतंत्रपणे शांततेसाठी आवाहन केले आहे. कुकी-जोमी समुदायाच्या १२ संघटनांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले असून परिस्थितीवर देखभाल ठेवण्यासाठी संयुक्त शांतता समिती तयार करण्यासही सहमती दर्शविली आहे. चुराचांदपूर व फेरझॉल जिल्ह्यांमधील सहा आमदारांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.