
इंफाळ : मणिपूरमधील मैतेईंची संघटना अरामबाई तेंगगोलच्या नेत्याला अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी राज्यातील अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. तणावाच्या पार्श्वभूमीवर इंफाळ खोऱ्यातील पाच जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, येथील इंटरनेट सेवाही तात्पुरत्या काळासाठी बंद करण्यात आली आहे.