Independence Day : स्वातंत्र्य दिनावर दहशतवाद्यांचं संकट; दिल्लीत होणार 3 प्रकारचे हल्ले?

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय.
Terrorist Attack
Terrorist Attackesakal
Summary

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय.

स्वातंत्र्यदिनाच्या (Independence day) पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा (Terrorist Attack) इशारा देण्यात आलाय. विशेष म्हणजे, यंदा तीन प्रकारचे इंटेलिजन्स अलर्ट (Intelligence Alert) दिले गेले आहेत. या आधारे सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. यावेळी सुरक्षा यंत्रणांना स्वातंत्र्य दिनासंदर्भात विविध प्रकारच्या संभाव्य धोक्यांबाबत सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरापासून ते लाँचिंग पॅड्स आणि दहशतवाद्यांची घुसखोरी ही बाब समोर आलीय.

'हे' आहेत तीन प्रकारचे इंटेलिजन्स अलर्ट

  1. पहिला इशारा म्हणजे, ड्रोन हल्ला करून कहर निर्माण करणं. यासाठी दहशतवादी पीओकेमध्ये ड्रोनला लक्ष्य करण्याचा सराव करत असल्याचं गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.

  2. दुसरा इशारा म्हणजे, अतिरेकी एखादा मोठा गुन्हा करण्यासाठी अत्याधुनिक आयईडी वापरून मेटल डिटेक्टरला चकमा देऊ शकतात.

  3. तिसऱ्या अलर्टमध्ये दहशतवाद्यांचा एक गट पीओकेमध्ये कोटिल (KOTIL) नावाच्या लॉन्चिंग पॅडवरून प्रवेश करेल, तर दुसरा पीओकेमधील डाटोटे (DATOTE) नावाच्या लॉन्चिंग पॅडवरून दिल्लीत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

Terrorist Attack
BJP-JDU : भाजपसोबत युती करूच याची शाश्वती नाही, जदयू नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

संशयास्पद गोष्टींकडं लक्ष द्या

इंटेलिजन्स अलर्टमध्ये सुरक्षा यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत की, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याची अत्यंत काळजीपूर्वक चौकशी करा. बॉम्ब असल्यास, तो निकामी करताना अधिक काळजी घ्या. कारण, अत्याधुनिक आयईडी मेटल डिटेक्टरलाही फसवू शकतात. त्यामुळं मेटल डिटेक्टरवर तैनात असलेल्या पोलिसांनीही विशेष काळजी घेऊन त्यांची योग्य तपासणी करावी.

Terrorist Attack
Bihar : साधूच्या वेशात भिक्षा मागणाऱ्या मुस्लिम तरुणांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण

सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर

हवाई हल्ल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर आहे. ड्रोन हल्ला होण्याची शक्यता असल्याने सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षा कर्मचारी हवेत उडणाऱ्या गोष्टींवर करडी नजर ठेऊन आहेत. ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी हवेत वस्तू उडवण्यास बंदी घातलीय. या अंतर्गत पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटर, हँग ग्लायडर्स, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोट ऑपरेटेड एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून, क्वाडकॉप्टर आणि पॅरा जंपिंगवर 15 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com