
यासिन मलिकला फाशी की जन्मठेप? थोड्याच वेळात होणार फैसला
नवी दिल्ली : टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रन्टचा विभाजनवादी नेता यासीन मलिक दोषी असल्याचं नुकतंच कोर्टात सिद्ध झालं होतं. यावर एनआयए कोर्टात आज अंतिम सुनावणी झाली त्यानंतर कोर्टानं दुपारी साडे तीन वाजेपर्यंत निकाल राखून ठेवला. दहशतवादी कारवायांना फंडिंग केल्याप्रकरणी मलिकला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (Terror funding case NIA seeks death panelty for Yasin Malik Court to pass judgment on sentencing today)
राष्ट्रीय तपास पथकाच्या (NIA) विशेष कोर्टानं १९ मे रोजी यासिन मलिक याला बेकायदा कारवाया प्रतिबध कायद्यांतर्गत (UAPA) सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पटियाला हाऊस कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आज सुनावणी सुरु होताच एनआयएनं दोषी मलिकच्या फाशीची मागणी केली होती. सर्व पक्षांचा शेवटचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं याप्रकरणाचा निर्णय दुपारी साडेतीन वाजेपर्यंत राखीव ठेवला.
हेही वाचा: ओबीसींसाठी शिवसेना सोडलीत आता राष्ट्रवादी सोडणार का? टिळेकरांचा भुजबळांना सवाल
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मलिकच्या आर्थिक स्थितीचं आकलनं करण्याचे निर्देश दिले होते. कारण दंडाची रक्कम निश्चित केली जावी. याप्रकरणात मलिकला जास्तीत जास्त मृत्यूदंडाचा सामना करावा लागू शकतो. तर त्याच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी शिक्षा जन्मठेप आहे. यासीनने १० मे रोजी कोर्टाला सांगितलं होतं की, आपल्याविरोधात लावलेले दहशतवादी कलमं, दहशतवादी फंडिंग, दहशतवादी कारवाया, देशद्रोह, फसवणूक अशी कृत्ये करणार नाही.
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, शिवसेनेकडून संभाजीराजेंचा पत्ता कट
दरम्यान, फारुक अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसर्त आलम, मोहम्मद युसूफ शाह, अफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल यांच्यासह २० काश्मीरी फुटिरतावादी नेत्यांच्याविरोधात औपचारिक स्वरुपात आरोप निश्चित केले आहेत.
सलाहुद्दीन आणि हाफीज सईद फरार घोषीत
आरोपपत्रानुसार, लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानात बसलेला संस्थापक हाफीज सईद आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सैय्यद सलाहुद्दीन विरोधातही खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी या दोघांना फरार घोषीत करण्यात आलं आहे.
Web Title: Terror Funding Case Nia Seeks Death Panelty For Yasin Malik Court To Pass Judgment On Sentencing Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..