मुंबईसह दिल्लीवर 'जैश'कडून हल्ल्याचा कट

वृत्तसंस्था
Thursday, 8 August 2019

मुंबईसह दिल्लीवर दहशतवादी हल्याचे सावट असून 'जैश-ए-मोहम्मद' ही दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. जैशचा दहशतवादी इब्राहिम असगर यांनी हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - मुंबईसह दिल्लीवर दहशतवादी हल्याचे सावट असून 'जैश-ए-मोहम्मद' ही दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. जैशचा दहशतवादी इब्राहिम असगर यांनी हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांनी यासंबंधी कंबर कसली असून योग्य ती दक्षता बाळगण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर येत्या 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत संघटना असल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणाच्या हाती आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrorist attack shadow on Delhi, including Mumbai