म्यानमार बॉर्डरवर अतिरेकी हल्ला; कमांडींग ऑफिसरच्या कुटुंबीयांसह सात जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

myanmar.

म्यानमार सीमेवर अतिरेकी हल्ला; कमांडींग ऑफिसरच्या कुटुंबीयांसह सात जणांचा मृत्यू

चुराचंदपूर: एक महत्त्वाची बातमी म्यानमार बॉर्डरवरुन येत आहे. 46 आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झाले आहेत. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी, मुलगा आणि ड्रायव्हर आणि इतर तीन सैनिक देखील या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील चुराचंदपूर येथे हा हल्ला झाला आहे. याबाबत आता मणिपूरमचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ट्विट करत दहशतवद्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, 46 AR च्या ताफ्यावरील भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात आज चुराचंदपूर येथे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबासह काही कर्मचारी मारले गेले आहेत. राज्य दल आणि निमलष्करी आधीच अतिरेक्यांचा माग काढण्यासाठी त्यांच्या कामावर आहेत. दोषींना न्याय मिळवून दिला जाईल.

loading image
go to top