ज्युदो-कराटे ट्रेनिंग सेंटरमध्ये दहशतवादी प्रशिक्षण! 'या' राज्यांमध्ये पसरलंय जाळं

NIAचा मोठा खुलासा
Terror Activities, NIA,Pune, Student
Terror Activities, NIA,Pune, Student
Updated on

नवी दिल्ली : देशातील विविध भागात जुदो-कराटेच्या क्लासेसमधून दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास एजन्सी अर्थात NIA नं तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील काही प्रशिक्षण केंद्रांवर छापेमारी केली, यामध्ये हा खुलासा झाला आहे. या दोन राज्यांसह इतर राज्यांमध्येही अशा प्रकारे प्रशिक्षण दिलं जात असल्याचं एनआयएनं म्हटलं आहे. (Terrorist training in Judo Karate Training Center net is spread in these states)

तेलंगाणा पोलिसांना सोशल मीडियातून मिळाली होती माहिती

एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणाद्वारे तरुणांची दिशाभूल केली जात आहे. तसेच त्यांना प्रशिक्षण देऊन देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची पहिल्यांदा माहिती ऑगस्टमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तेलंगाणा पोलिसांना मिळाली होती. तेलंगाणा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली तसेच काही जणांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर याचे अनेक फाटे समोर आले. यानंतर याची संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला देण्यात आली. त्यानंतर केंद्रानं याच्या तपासाची जबाबदारी एनआयएवर सोपवली.

Terror Activities, NIA,Pune, Student
Oscars 2023 : 'छेल्लो शो' भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री

त्यानंतर एनआयएनं यासंदर्भात रविवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामध्ये ३२ हून अधिक ज्युदो-कराटे क्लासेसवर छापेमारी केली. या कारवाईत चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, अशा प्रकारे ज्युदो-कराटे क्लासेसमधून दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण देण्याचा प्रकार देशातील अनेक भागांमध्ये सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये केरळ, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून होते सुरुवात

सुरुवातीला फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क केला जातो. त्यानंतर त्यांना धर्माच्या आधारावर भडकवलं जातं. त्यानंतर यामध्ये यशस्वी ठरणाऱ्या तरुणांना पुढील टप्प्यासाठी निवडलं जातं. त्यानंतर त्यांना ज्युदो-कराटेच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. यानंतर या क्लासेसमध्ये त्यांना धर्मावर आधारित द्वेषाची बीजं रोवण्याचं काम केलं जातं. त्यानंतर हेच तरुण पुढे देशातील विविध देशविरोधी कारवायांमध्ये सामिल होतात, असं एनआयएनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com