चीनी संपादकाला आनंद महिंद्रांच सडेतोड उत्तर; वाचून वाटेल अभिमान

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

भारतीयांकडे तसे काही नाही की, जे चीनी नागरिकांनी बॅन करावे, असे म्हणत संपादक महाशयांनी निशाणा साधला होता. यावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

मुंबई : चीनमधील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सचे संपादक हू शिजिन ट्विट करुन भारतीयांना चॅलेंज केलं की, चीनच्या लोकांनी भारतीय उत्पादनास बॅन करायचा निर्णय घेतला, तर त्यांना पर्यायही नाही. कारण, भारतीयांकडे तसे काही नाही की, जे चीनी नागरिकांनी बॅन करावे, असे म्हणत संपादक महाशयांनी निशाणा साधला होता. यावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणाले उद्योगपती आनंद महिंद्रा
आपण भारतीयांना उद्देशून केलेली टीका ही पहिल्यांदाच आहे, त्यामुळे सर्वात प्रेरक आणि प्रभावी सिद्ध होईल. आम्हाला डिवचल्याबद्दल धन्यवाद, आम्ही या संधीचं सोनं करुन दाखवू; असे प्रत्युत्तर महिंद्रा यांनी दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष सुरु आहे. त्यातंच केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदीही घातली. आजही गलवान खोरं आणि नजिकच्या भागात चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच आहेत. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या 43 सैनिकांना ठार करण्यात आलं आहे. तेव्हापासून देशभरातून चीनवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. तर, भारतीयांनी चिनी अ‍ॅप्स, मोबाईल आणि इतर सर्व गोष्टी वापरणं बंद करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. त्यातंच केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदीही घातली. केंद्र सरकारच्या या बंदीनंतर चीनच्या सत्ताधारी पक्षाच्या वृत्तपत्राने भारतावर टीका केलीय. या टीकेला उद्योगपती आनंद महिंद्रांनी जशात तसं उत्तर दिले.
-------------- 
मोदींचे बिहार राजकारण : चीनच्या मुद्द्यावर शब्दही नाही छटपूजेचा मात्र आवर्जून उल्लेख
--------------
मोदींच्या भाषणावर राहुल गांधीना आठवला जुना शेर; काय आहे तो शेर?
--------------
भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने रात्री जाहीर केला होता. त्यामध्ये भारतातील लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप असलेल्या टीकटॉकचाही समावेश आहे. यावर ग्लोबल टाईम्सचे संपादक हू शिजिन ट्विट करुन भारतीयांना चॅलेंज केले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयावर त्यांनी नाराजीही दर्शवली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thank You For Provocation : Anand Mahindra on Chinas Threat to Ban Indian Goods