esakal | Lakhimpur: 'ती अ‍ॅक्शनची रिअ‍ॅक्शन!' भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येवर टीकैतांची स्पष्टोक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

rakesh tikait

'ती अ‍ॅक्शनची रिअ‍ॅक्शन!' भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येवर टीकैतांची स्पष्टोक्ती

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : भारतीय किसान संघाचे (BKU) नेते राकेश टिकैत यांनी काल शनिवारी लखीमपूर खिरी हिंसा प्रकरणात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, तीन कार्यकर्त्यांची हत्या म्हणजे आंदोलकांना चिरडण्याच्या नृशंस घटनेची प्रतिक्रिया होती. हे काही पूर्वनियोजित नव्हतं तसेच या हत्या देखील नाहीयेत. टीकैत यांनी पुढे म्हटलं की, ही अ‍ॅक्शनची रिअ‍ॅक्शन होती.

त्यांनी पुढे म्हटलं की, जर रस्त्यावर दोन गाड्या एकमेकांना धडकल्यानंतर दोन्ही बाजू एकमेकांसमोर येऊन मारहाण करु लागतात तेंव्हा हे काय आहे? ही केवळ एक प्रतिक्रिया आहे. याचा हत्येमध्ये समावेश होत नाही. मी याला हत्या मानत नाही. गेल्या रविवारी लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या हिंसेत चार शेतकऱ्यांसमवेत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.

आरोपी अजय मिश्राला अटक

गृहमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला आज उत्तर प्रदेश पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केली. पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर अजय यांना चौकशीला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप आशिष मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.

आता ‘रेल्वे रोको’

दिल्लीच्या सीमांवर ११ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या वतीने येत्या १८ ऑक्टोबरला देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या दसऱ्याला (ता.१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात येईल, अशी घोषणा आंदोलनाचे नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव आदींनी केली.

loading image
go to top