Bhagoria Holi : ५०० वर्षे जुनी टिंडर होळी! पोरगी पसंत पडली तर थेट पळवून नेण्याची परंपरा; या गावात भरतो 'प्रेमाचा मेळा'

Madhya Pradesh Tourism : मध्य प्रदेशातील आदिवासी पट्ट्यात होळीनिमित्त 'भगोरिया' हा अनोखा लोकउत्सव साजरा केला जातो, जिथे पारंपरिक पद्धतीने पानाचा विडा किंवा गुलाबी गुलाल देऊन तरुण-तरुणी आयुष्यभराचा जोडीदार निवडतात; वाचा या रंजक परंपरेबद्दल सविस्तर माहिती.
Ancient Love Fair: 500-year-old tradition of choosing partners at Holi festival in Madhya Pradesh.

Ancient Love Fair: 500-year-old tradition of choosing partners at Holi festival in Madhya Pradesh.

sakal

Updated on

होळीच्या सणाला रंगांसोबतच प्रेमाचा रंग चढला तर? मध्य प्रदेशातील आदिवासी पट्ट्यात होळीच्या निमित्ताने एक असा मेळा भरतो, जिथे केवळ रंग उधळले जात नाहीत, तर आयुष्यभराचा जोडीदारही निवडला जातो. या अनोख्या परंपरेला 'भगोरिया' उत्सव असे म्हणतात.

मध्य प्रदेशातील झाबुआ, धार, अलीराजपूर आणि खरगोन यांसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये होळीच्या सात दिवस आधी 'भगोरिया' हा लोकउत्सव साजरा केला जातो. हा केवळ एक बाजार नाही, तर आदिवासी संस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव आहे. येथे तरुण-तरुणी पारंपरिक कपडे आणि दागिने घालून सजून-धजून येतात आणि ढोल-ताशांच्या गजरात आपला जोडीदार शोधतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com