दिल्ली हायकोर्टाकडून अभिनेत्री जुही चावलाला 20 लाखांचा दंड

Juhi Chawala
Juhi ChawalaTeam esakal

नवी दिल्ली: अभिनेत्री जुही चावलाला 20 लाखांचा दंड झाला आहे. कायद्याचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत तिला हा दंड दिल्ली हायकोर्टाकडून करण्यात आला आहे. कोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीची लिंक जुहीने सोशल मीडियात टाकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. केवळ प्रसिद्धीसाठी तिने ही याचिका दाखल केल्याचं कोर्टाने म्हटलंय. तिने ही लिंक सोशल मिडीयात शेअर केल्यामुळे ऑनलाईन सुनावणीत एका चाहत्याने येऊन तिची गाणी म्हणण्याचा आचरट प्रकार घडला होता. कोर्टाच्या कामात अडथळा आणला होता. या प्रकरणी आता जुही चावलालाच 20 लाखांचा दंड कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे. देशात 5 जी तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं त्यामुळे त्यावर स्थगिती लावाली, अशी याचिका जुही चावलाने केली होती. (The Delhi Highcourt order said that the plaintiffs abused the process of law imposes a fine of Rs 20 lakhs)

पर्यावरणप्रेमी अभिनेत्री जूही चावला हिने देशात 5G वायरलेस तंत्रज्ञान स्थापित करण्याच्या विरोधात दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार, फिर्यादींनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. त्यामुळे कोर्टाने जुहीवर 20 लाखांचा दंड ठोठावला आहे. हा दावा प्रसिद्धीसाठी होता असे दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. फिर्यादी जूही चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीची लिंक प्रसारित केली होती, ज्यामुळे सुनावणी दरम्यान तीनदा व्यत्यय निर्माण झाला होता. दिल्ली पोलिस त्या व्यक्तींला शोधून कार्यवाहीत विघ्न निर्माण करणार्‍यांवर कारवाई करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com