
BBC IT Raid : छापेमारीवर BBC ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आशा करतो की..."
बीबीसीमधल्या दिल्ली आणि मुंबईतल्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाची छापेमारी झाली आहे. हा आता जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. बीबीसीनेही त्याबद्दल भाष्य केलं आहे.
बीबीसीने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरुन एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये बीबीसीने म्हटलं आहे, "आयकर अधिकारी सध्या नवी दिल्ली आणि मुंबई येथील बीबीसी कार्यालयात आहेत आणि आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. ही परिस्थिती लवकरात लवकर निवळेल अशी आम्हाला आशा आहे."
२००२ च्या गुजरात दंगलीवर बीबीसीने एक माहितीपट तयार केला होता. यावर भारत सरकारने बंदी घातली आहे. त्यानंतर काही दिवसांमध्ये बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईमधल्या बीबीसीच्या कार्यालयांवर ही छापेमारी झाली आहे.
मात्र ही छापेमारी नाही तर दोन्ही शहरांमधल्या ऑफिसेसमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण आयकर विभागाकडून देण्यात आलं आहे.