Kashmir Files: चित्रपटातून केवळ दहा टक्केच अत्याचार दाखवले-सुरेंद्र कौल

काश्‍मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न हवेत असं मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. सुरेंद्र कौल
डॉ. सुरेंद्र कौलSakal
Updated on

लोकशाहीत काश्‍मिरी पंडित समाजाचे असंख्य तुकडे झाले, जिवंत राहण्यासाठी कमालीचा संघर्ष करावा लागला. गेल्या तीन दशकांच्या वेदना प्रखरपणे एका सिनेमाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. आता केंद्र आणि काश्मीरमधील सरकारची जबाबदारी आहे, की काश्‍मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करून या समाजाला न्याय दिला पाहिजे, अशी या समाजाची भावना आहे. या चित्रपटाचा वैचारिक आधार असलेल्या ‘ग्लोबल काश्‍मिरी पंडित डायस्पोरा’ या संघटनेचे संस्थापक डॉ. सुरेंद्र कौल यांच्याशी संतोष शाळिग्राम यांनी केलेली बातचीत.

‘दि काश्‍मीर फाइल्स’ सिनेमाविषयी दोन मते आहेत. त्याला वास्तवही म्हटले गेले आणि प्रचारकी देखील..

- डॉ. कौल : आमच्या संघटनेने हा सिनेमा तयार व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. पीडित सातशे पंडितांच्या मुलाखतीआधारे चित्रपट बनवला गेला असल्याने तो वास्तवदर्शीच आहे. त्यात दाखविलेले अत्याचार केवळ दहा टक्के आहेत. पडद्यावर दाखवता येणार नाही, असा अनन्वित छळ पंडितांनी सहन केला. आमच्या वेदना जगाला समजण्यासाठी एका सिनेमाची गरज लागली, हेच व्यवस्थेचे अपयश आहे. सिनेमा येण्यापूर्वी हा विषय का दुर्लक्षित राहिला की ठेवला गेला? काश्‍मिरातून पाच लाख लोक काही पर्यटनासाठी तर बाहेर पडले नाहीत. हे टीकाकारांनी समजून घ्यावे.

काश्‍मिरी पंडितांवरील अत्याचाराची कुणीच का दखल घेतली नाही, याबद्दल काय वाटते?

- पंडितांच्या नरसंहाराची माहिती सर्वांना होती. परंतु हे वास्तव कोणत्या शक्ती दाबू इच्छित होत्या, हेही आम्हाला माहीत आहे. आम्ही या काळात मानवतेचा खून पाहिला. सरकारी तंत्र आणि न्याय व्यवस्थेचे मौन देखील पाहिले आहे. लोकशाहीत एका समाजाने एवढे अत्याचार सहन करावे आणि कुणीच त्याबद्दल बोलू नये, हे उद्विग्न करण्यासारखे आहे. मात्र, दहशतवाद्यांचे क्रौर्य पाहून देखील पंडितांनी साधा खडा देखील कुणाला मारला नाही.

चित्रपटाने वास्तव दाखवले असे मानले, तरी दुसऱ्या समाजाविषयी द्वेषाची भावना तयार झाली आहे

- कोणत्याही समाजाविषयी द्वेष पसरावा हा आमचा हेतू नाही. इतिहास कडू आहे म्हणून ते शिकविणे बंद करायचे का? सिनेमा तयार झाल्यानंतर अमेरिकेत त्याचे शो दाखविले. ते पाहण्यासाठी मुस्लिम बांधवही होते. त्यातील अत्याचार पाहून त्यांनाही अश्रू अनावर झाले होते. चित्रपटामुळे द्वेष पसरतो, हा केवळ काही राजकीय पक्षांचा प्रचार आहे. हा चित्रपट मानवता विरुद्ध दहशतवादी असे ध्रुवीकरण नक्कीच करतो.

काश्‍मिरी पंडितांना प्रचंड सहानुभूती मिळते आहे. आता तुमच्या काय अपेक्षा आहेत?

- नरसंहारातील दोषींना अद्याप शिक्षा झालेली नाही. त्याची प्रक्रिया सरकारने सुरू करावी. त्यासाठी विशेष लवाद स्थापन करावा. काश्‍मिरातील आमच्या मालमत्ता आम्हाला पुन्हा मिळाव्यात. या मालमत्तांची किंमत आजच्या बाजारभावानुसार ३५ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी आहे. प्रत्येक काश्‍मिरी पंडिताला पुन्हा आपल्या जन्मस्थळी जायचे आहे. त्यामुळे तिथे आमचे पुनर्वसन करावे.

पुनर्वसनासाठी तुम्ही काही आराखडा तयार केला आहे का?

- ‘ग्लोबल काश्‍मिरी पंडित डायस्पोरा’ने दोन वर्षे परिश्रम करून एक आराखडा तयार केला आहे. त्यासाठी नगरनियोजन तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. काश्‍मिरी पंडितांसाठी आणि अन्य सर्वधर्मीय मानवतावादी लोकांसाठी तिथे मॉडेल सिटी असावी, अशी मागणी आहे. जगभरातील काश्‍मिरी पंडितांची संख्या दहा लाख आहे. यापैकी ज्यांची इच्छा आहे, त्यांचे पुनर्वसन तिथे झाले पाहिजे. या मॉडेल सिटीमुळे अन्य कोणत्याही धर्मियांना विस्थापित व्हावे लागणार नाही, अशाच पद्धतीने आराखडा तयार केला आहे. त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरच सादर करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com