
हा देश बहुसंख्याकांचा असून त्यांच्या इच्छेनुसारच तो चालेल, असे वादग्रस्त विधान अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखरकुमार यादव यांनी नुकतेच विहिंपच्या एका कार्यक्रमात केले. त्यांनी अल्पसंख्याक समुदायाला उद्देशून ‘कठमुल्ला’ असा शब्दही वापरला.
थेट न्यायाधीशांनीच अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने नवीन वादाला आमंत्रण मिळू शकते. प्रसारमाध्यमांतील वृत्तानंतर सर्वोच्च न्यायालयानेही यादव यांच्या या वक्तव्याची दखल घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून सविस्तर माहिती मागितली आहे. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाकडून याप्रकरणी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.