
नवी दिल्ली : अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) स्थापन करावी तसेच उत्तरप्रदेशातील संभळमध्ये झालेल्या जातीय दंगलीची चौकशी करण्यात यावी, या मागण्यासाठी राज्यसभेतील आज विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दिले, परंतु या मुद्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. यानंतर सभापती जगदीप धनकड यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.