'PM किसान योजनेत' झाला सहावा बदल! 'याच्या'शिवाय रखडेल दहावा हप्ता

'पीएम किसान योजनेत' झाला सहावा बदल! 'याच्या'शिवाय रखडेल दहावा हप्ता
'पीएम किसान योजनेत' झाला सहावा बदल! 'याच्या'शिवाय रखडेल दहावा हप्ता
'पीएम किसान योजनेत' झाला सहावा बदल! 'याच्या'शिवाय रखडेल दहावा हप्ताesakal
Summary

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता आता 25 डिसेंबरपूर्वी येणार नाही असे दिसते.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 10 वा हप्ता आता 25 डिसेंबरपूर्वी येणार नाही असे दिसते. कारण, लाभार्थ्यांची स्थिती पाहता आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल असे दिसते. डिसेंबर- मार्चचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) अद्याप कोणतीही तारीख निश्‍चित केलेली नाही. तसेच, या महिन्यापर्यंत पीएम किसान योजनेत 5 बदल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यातच यात आणखी एक बदल झाला आहे. या बदलांतर्गत आता शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) करणे आवश्‍यक झाले आहे. आतापर्यंत काय बदल झाले ते जाणून घेऊया... (The Prime Minister's Kisan Samman Nidhi Yojana has now undergone the sixth change)

'पीएम किसान योजनेत' झाला सहावा बदल! 'याच्या'शिवाय रखडेल दहावा हप्ता
कुपवाडात BJP नेत्याच्या सुरक्षेसाठी तैनात SPO शस्त्रांसह बेपत्ता!

ई-केवायसी अनिवार्य

सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केले आहे. पोर्टलवर आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्‍लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधा. तसेच, तुम्ही घरी बसूनही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने हे साध्य करू शकता.

धारण मर्यादा संपली

योजनेच्या सुरुवातीला केवळ तेच शेतकरी (Farmers) पात्र मानले जात होते, ज्यांच्याकडे 2 हेक्‍टर किंवा 5 एकर शेती होती. आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारने ही सक्ती दूर केली आहे.

आधार कार्ड अनिवार्य (Aadhaar Card)

जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आधार कार्ड. आधार कार्डशिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सरकारने लाभार्थ्यांसाठी आधार अनिवार्य केले आहे.

'पीएम किसान योजनेत' झाला सहावा बदल! 'याच्या'शिवाय रखडेल दहावा हप्ता
'या' देशात काडीपेटीपेक्षाही कमी दरात मिळते पेट्रोल!

स्व-नोंदणी सुविधा

पीएम किसान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी मोदी सरकारने संबंधित अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारण्याची सक्ती संपवली आहे. आता शेतकरी घरी बसून नोंदणी करू शकतात. तुमच्याकडे पॅनकार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बॅंक खाते क्रमांक असल्यास pmkisan.nic.in वर फार्मर्स कॉर्नरवर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकता.

स्टेटस तपासण्याची सुविधा

सरकारने आणखी एक मोठा बदल केला आहे की नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमचा स्टेटस स्वतः तपासू शकता. जसे की तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, तुमच्या बॅंक खात्यात किती हप्ता आला आहे आदी आता पीएम किसान पोर्टलला भेट देऊन कोणताही शेतकरी त्याचा आधार क्रमांक, मोबाईल किंवा बॅंक खाते क्रमांक टाकून स्थितीची माहिती मिळवू शकतो.

किसान क्रेडिट कार्ड आणि मानधन योजनेचे फायदे

आता किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card - KCC) देखील PM किसान योजनेशी जोडले गेले आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांना KCC बनवणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांना KCC वर 4 टक्के दराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. त्याचवेळी, पीएम- किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र देण्याची गरज नाही. या योजनेंतर्गत, शेतकरी पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देऊ शकतात.

'पीएम किसान योजनेत' झाला सहावा बदल! 'याच्या'शिवाय रखडेल दहावा हप्ता
Gmail युजर्स सावधान! Omicron च्या नावावर होत आहे आर्थिक फसवणूक

कधी मिळणार दहावा हप्ता?

मोदी सरकारने गेल्या वेळी 25 डिसेंबर रोजी डिसेंबर-मार्चचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. आत्तापर्यंत फक्त दहाव्या हप्त्यासाठी राज्याने स्वाक्षरी केलेले Rft लाभार्थ्यांच्या केवळ Rft Signed by State For 10nth Installment एवढंच दिसत आहे. येथे Rft चा फुलफॉर्म Request For Transfer असा आहे, ज्याचा अर्थ 'लाभार्थीचा डेटा राज्य सरकारने सत्यापित केला आहे, जो योग्य असल्याचे आढळले आहे'. राज्य सरकार केंद्राला लाभार्थीच्या खात्यात पैसे पाठवण्याची विनंती करते. त्यानंतर, FTO तयार करावे लागेल, ज्याचे पूर्ण स्वरूप फंड ट्रान्सफर ऑर्डर आहे. जर FTO चा मेसेज जनरेट झाला असेल आणि पेमेंट कन्फर्मेशन प्रलंबित असेल तर स्टेटसमध्ये तुमचा हप्ता लवकरच तुमच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर केला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com