Vaishno Devi Devasthan sakal
देश
Vaishno Devi Devasthan : वैष्णोदेवीच्या‘रोप वे’ प्रकल्पांवरून वादंग कायम
Vaishno Devi Devasthan : कटरा येथील वैष्णो देवी मंदिराच्या पायीमार्गालगत प्रस्तावित रोप वे प्रकल्पावरून वाद सुरू असून, आंदोलन करणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कटरा/जम्मू : श्री माता वैष्णो देवी देवस्थान मंडळाच्या कटरा येथील बेस कॅम्पवर वैष्णादेवी मंदिराच्या पायीमार्गालगत प्रस्तावित रोप वे प्रकल्पावरून निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. प्रशासनाने आंदोलनकर्त्यांकडून पंधरा डिसेंबरपर्यंत वेळ मागून घेतलेली असताना आज निदर्शने झाल्याने पोलिसांनी दोन संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेतले. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.