New Delhi : भारतीय हवाई क्षेत्राचा मानबिंदू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय हवाई क्षेत्राचा मानबिंदू

भारतीय हवाई क्षेत्राचा मानबिंदू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (जेवार विमानतळ)चे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. जेवार विमानतळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ असेल. जेवार विमानतळावरून सप्टेंबर २०२४ रोजी पहिले उड्डाण होणे अपेक्षित आहे. या विमानतळावर एकूण पाच धावपट्ट्या असतील. दोन वर्षानंतर जेवार विमानतळ कार्यान्वित होईल, तेव्हा फ्लोरिडाच्या ऑरलँडो विमानतळाला मागे टाकून चौथ्या स्थानावर झेप घेईल. अर्थात दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा संपूर्ण आकार घेण्यासाठी आणखी नऊ वर्षे वाट पाहावी लागेल.

खर्च

कोटी रुपये - २९,६५०

जागा -५,८४५ हेक्टर

विमान क्षमता -१७८

विमाने एकावेळी उभे राहतील

प्रवासी क्षमता

  1. पहिल्या वर्षी ४० लाख प्रवाशांची वर्दळ

  2. २०२६ पर्यंत ७० लाख प्रवाशांची वर्दळ

  3. २०४४ पर्यंत ८ कोटी प्रवाशांची वर्दळ

रोजगार निर्मिती -८६ हजार जणांना थेट रोजगार

  1. दळणवळण सुविधा -चार एक्स्प्रेस वे, मेट्रो, बुलेट ट्रेन, पॉड टॅक्सीची सुविधा

  2. औद्योगिक विकास विमानतळाजवळ - ६९ कंपन्यांना १४६ हेक्टर औद्योगिक भूखंड

  3. जेवारपासून किती अंतर (किलोमीटरमध्ये)

  4. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : ९०

  5. नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद : ४०

  6. ग्रेटर नोएडा : २८

  7. आग्रा : १४०

loading image
go to top