Video: देवीसमोर कान पकडले, उठा-बशा काढल्या अन्...

वृत्तसंस्था
Friday, 22 November 2019

देवीच्या मंदिरात गेला. कान पकडले, उठा-बशा काढल्या. देवीला अनेकदा वाकून नमस्कार केला. माफीसुद्धा मागितली अन् देवीचा मुकूट चोरला. मुकूट चोरल्यानंतर पुन्हा माफी मागितली.

हैदराबाद: देवीच्या मंदिरात गेला. कान पकडले, उठा-बशा काढल्या. देवीला अनेकदा वाकून नमस्कार केला. माफीसुद्धा मागितली अन् देवीचा मुकूट चोरला. मुकूट चोरल्यानंतर पुन्हा माफी मागितली. पण, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणातील हैदराबादमधील अबिड्स परिसरात दूर्गा मातेचे मंदिर आहे. देवीचा मुकूट चोरताना चोरटा मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चोरट्याने देवीचा 25 किलो चांदीचा 10 हजार रुपये किंमतीचा मुकूट चोरला. मुकुट चोरण्यापूर्वी चोराने देवीच्या मूर्तीसमोर उठा-बशा काढल्या. कान पकडून माफी मागितली, नमस्कार केला. पुन्हा नमस्कार करून देवीचा मुकूट चोरून शर्टाच्या आतमध्ये लपवून पसार झाला. देवीचा मुकूट चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चोराला खूपच गरज असावी तर चोर अखेर पकडलाच, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft in durga temple caught on camera at hyderabad