Mon, Jan 30, 2023

CM Basavaraj Bommai : मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी वेगळे महाविद्यालये नाही; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
Published on : 1 December 2022, 7:24 pm
बंगळूर : सरकारने राज्यातील मुस्लिम महिला विद्यार्थ्यांसाठी दहा महाविद्यालये उघडण्यास वक्फ बोर्डाला संमती दिल्याचे वृत्त फेटाळून लावत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले की, प्रशासनाच्या स्तरावर अशी कोणतीही चर्चा झाली नाही. हे वक्फ बोर्ड अध्यक्षांचे वैयक्तिक मत असू शकते, मात्र अशी सरकारची कोणतीही भूमिका नाही. कर्नाटकाच्या हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनीही निवेदन जारी करून स्पष्ट केले आहे की, मुस्लिम महिलांसाठी वेगळे महाविद्यालये सुरू करण्याबाबत सरकारपुढे कोणताही प्रस्ताव नाही. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचे यासंदर्भातील विधान त्यांचे वैयक्तिक आहे. आपण आधीच वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांशी बोलले आहे. त्याबद्दल स्पष्टीकरण जारी करण्यास त्यांना सांगितल्याचे जोल्ले यांचे म्हणणे आहे.