RTIमध्ये खुलासा! ना ताजमहलमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती, ना मंदिरांच्या जागेवर ताजमहल

Tajmahal
Tajmahal

ताजमहाल : ताजमहालमध्ये हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आणि मंदिर असल्याच्या दाव्यावरून मागील काही दिवसांत देशभरात गदारोळ पाहायला मिळाल होता. मात्र या संदर्भात आरटीआयमध्ये मोठा खुलासा झाला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) आरटीआयअंतर्गत उत्तर दिले आहे. एएसआयने ताजमहालमध्ये हिंदू देवतांच्या मूर्तींचे अस्तित्व नाकारले आहे. तसेच ताजमहाल कोणत्याही मंदिराच्या जमिनीवर बांधला गेला नसल्याचं म्हटलं आहे. (there is no idol of hindu gods in taj mahal says asi)

Tajmahal
सुप्रीम कोर्टाचा अपमान करणाऱ्या वेब पोर्टलवर कारवाई करा : साकेत गोखले

पहिल्या प्रश्नात साकेत गोखले यांनी ताजमहालच्या जमिनीवर मंदिर सल्याचा पुरावा मागितला होता. दुसऱ्या प्रश्नात त्यांनी तळघरातील 20 खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींबद्दल विचारले होते. पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना एएसआयने एका शब्दात 'नाही' असे लिहिले आहे. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात, तळघरांमध्ये हिंदू देवी-देवतांची मूर्ती नाही, असे म्हटले आहे.

ताजमहालचे दरवाजे उघडण्यासाठी याचिका दाखल

भाजपचे अयोध्या मीडिया प्रभारी डॉ. रजनीश सिंह यांनी 7 मे रोजी न्यायालयात याचिका दाखल करून ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याची मागणी केली होती. या खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती असतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. या बंद खोल्या उघडून तेथील रहस्य जगासमोर उलगडले पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली होती.

Tajmahal
‘गुजरातप्रकरणी क्लिनचिट दिल्याने भाजप खूश; नूपुर शर्मावर काय बोलणार’

याचिकाकर्ते रजनीश सिंह यांनी राज्य सरकारकडे याप्रकरणी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून ताजमहालच्या खोल्यांच्या गुपितांबाबत देशात अनेक ठिकाणी वाद झाले. दुसरीकडे ताजमहाल हा जागतिक वारसा असून त्याला धार्मिक रंग देऊ नये, असं इतिहासकारांचे म्हणणे आहे..

याआधीही ताजमहालमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला होता. तेव्हाही भारतीय पुरातत्व विभागाने मूर्तींचे अस्तित्व नाकारले होते. विशेष म्हणजे, यापूर्वी ताजमहाल पूर्वी मंदिर असल्याचा दावा अनेक हिंदू संघटनांनी वारंवार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com