संघराज्य रचनेला धक्का नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Prakash Javdekar

संघराज्य रचनेला धक्का नाही

नवी दिल्ली :सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कायद्यातील नवी दुरुस्ती म्हणजे कॉंग्रेसच्या राज्यात अकारण निर्माण करण्यात आलेली असमानता दूर करणे आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. या बदलांमागे केवळ देशाची सुरक्षा हा प्रमुख हेतू आहे व संघराज्य रचनेला धक्का लावण्याचा प्रश्न येतो कोठे, अशा शब्दांत भाजपकडून याचे ठाम समर्थन करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी सरकारने बीएसएफ कायद्यात नुकतीच दुरुस्ती केल्याचा निर्णय घेतला. यात मिळालेल्या वाढीव अधिकारानुसार आता बीएसएफचे अधिकारी पंजाब, पश्चिम बंगाल व आसाम मधील आंतरराष्ट्रीय सीमेपासून सध्याच्या १५ किलोमीटर ऐवजी ५० किलोमीटरच्या विस्तारित परिघात तपास करणे, छापे टाकणे, जप्ती व अटक करणे या कारवाया करू शकतील. मात्र कॉंग्रेससह विरोधकांनी टीका केली असून हा बदल घातक असल्याचे म्हटले आहे. माकपने हे बदल त्वरित रद्द करावेत अशी मागणी केली आहे. भाजपच्या मते, यामुळे सीमावर्ती राज्यांत विशेषतः पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीला व अवैध व्यापाराला आळा घालणे हा मुख्य उद्देश आहे. जावडेकर म्हणाले, की काँग्रेसच्या राजवटीतच बीएसएफला हे अधिकार दिले होते. पण त्यात मोठी असमानता होती. आता सर्व सीमावर्ती राज्यांत बीएसएफला ५० किमीपर्यंतचे अधिकार देण्यात आले आहेत. संघराज्य रचनेला यामुळे बिलकूल धक्का लागलेला नाही व लागणार नाही असाही दावा त्यांनी केला.

Web Title: There Is No Push To Form A Federation Prakash Javadekars Opinion On Border Security Force Act Amendment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..