esakal | पंजाबमध्ये भारनियमनाचा त्रास, दररोज तीन तास बत्ती होणार गुल
sakal

बोलून बातमी शोधा

वीज

पंजाबमध्ये भारनियमनाचा त्रास, दररोज तीन तास बत्ती होणार गुल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Punjab Power Cuts : कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पंजाबमधील वीज संकट आधिकच गडद होत चाललं आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दरररोज सरासरी तीन तास वीज कपात होईल. लोकांनी वीज वापर कमी करावी, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. कोळशाच्या टंचाईमुळे रविवारी पंजाबमधील एक औष्णिक विद्युत केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे राज्यातील वीज उत्पादन अर्ध्यावर आले आहे. सध्या खासगी औष्णिक विद्युत केंद्राकडे केवळ 36 तास पुरेल इतकाच कोळसा शिल्लक राहिला आहे.

पंजाबमध्ये वीज संकट गडद होत असतानाच पंजाबमधील सरकारी औष्णिक विद्युत केंद्रासाठी 11 रॅक कोळसा रवाना करण्यात आला. हा कोळसा प्रकल्पापर्यंत पोचण्यासाठी एक दोन दिवस लागणार आहेत. सध्या पंजाबमध्ये सुरू असलेल्या वीज प्रकल्पात निम्मीच वीज तयार होत आहे. त्यामुळे पंजाबच्या नागरिकांना 13 ऑक्टोबरपर्यंत चार ते सहा तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

विजेची टंचाई जाणवत असल्यामुळे पंजाबमध्ये काही तासांसाठी भारनियमन लागू केले जात आहे. जालंधरमध्ये रविवारी दिवसभरात दोनदा सहा-सहा तासांचे भारनियमन करण्यात आले. या काळात शहरात वीजपुरवठा ठप्प होता. अन्य जिल्ह्यांत चार तासांपर्यंत वीज कपात केली जात आहे.

loading image
go to top