या घटनेचा व्हिडिओ शेजारच्या इमारतीतील दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात संशयित एका मोटारीमधून पळून जाताना दिसले आणि त्या गाडीची नंबर प्लेटही दिसली आहे.
बंगळूर : सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे (Black Spray) मारून चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम मशीन कापली आणि त्यामधील लाखो रुपये घेऊन पळ काढला. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास होस्कोट (जि. बंगळूर ग्रामीण) येथील सुलिबेले येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये (State Bank ATM Machine) ही घटना घडली.