तिसऱ्या लाटेत रोज ५ लाखांपर्यंत नवीन रुग्ण सापडू शकतात; आरोग्य सचिव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

तिसऱ्या लाटेत रोज ५ लाखांपर्यंत नवीन रुग्ण सापडू शकतात; आरोग्य सचिव

नवी दिल्ली - देशातील कोरोना संसर्गाची (Coronavirus) दुसरी लाट (Second Wave) संपली असे आपण अजूनही म्हणू शकत नाही. येत्या सप्टेंबर (September) आणि ऑक्टोबरमध्ये (October) आपल्याला विशेष काळजी (Care) घ्यावी लागेल. आरोग्यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करत सणासुदीच्या काळातील गर्दीही टाळावी लागेल, असे आवाहन केंद्र सरकारने देशवासीयांना केले आहे.

या संसर्गाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये सुरू होऊन ऑक्टोबरमध्ये रोज ५ लाखांपर्यंत नवीन रुग्ण पुन्हा सापडू शकतात असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने दिला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नमूद केले. आरोग्य नियमांच्या पालनाबाबत नागरिकांमध्ये पुन्हा बेफिकीरी दिसून येत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. केरळमध्ये सणासुदीनंतर अचानक झालेल्या मोठ्या रुग्णवाढीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये सावधानता बाळगावी, सण साजरे करताना नियमांचे पालन करावे असे सरकारने पुन्हा बजावले आहे.

हेही वाचा: सरकारचा विमा क्षेत्रातील वाटा निर्गुंतवणुकीनंतरही राहणार- निर्मला सीतारामन

दिल्लीत संसर्ग ओसरला

केंद्राने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रात अजूनही सर्वाधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये अजूनही एक लाखांपेक्षा जास्त सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील एकूण रुग्णांच्या ५१ टक्के रुग्ण केरळमध्ये तर सोळा टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होऊ लागली आहे.

राज्यातील ६ जिल्हे अजूनही हॉटस्पॉट

मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असलीतरीसुद्धा येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. दुसऱ्या लाटेचे शेपूट अद्याप वळवळत असल्याने मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. सध्या दिवसाला शंभर ते दीडशे मृत्यूंची नोंद होते आहे.राज्यातील सहा ते सात जिल्ह्यांतील स्थिती अद्याप चिंताजनक असून शक्य असेल तर लोकांनी प्रवास टाळायला हवा असे टास्क फोर्सने म्हटले आहे. पुणे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. हे जे सहा हॉटस्पॉट आहेत तिथे गणेशोत्सवादरम्यान जास्तीत जास्त नागरिक मुंबईतून किंवा इतर ठिकाणांहून प्रवास करतील. त्यामुळे, या नागरिकांनी तेथील अन्य व्हेरिएंटचा संसर्ग मुंबईत आणला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.

हेही वाचा: अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'हा' ऑनलाईन मेळावा

गणेशोत्सवानंतर मुंबईतील किंवा राज्यातील संख्या पुन्हा वाढण्याची भीती असल्याचे राज्य टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. गणेशोत्सवादरम्यान किंवा इतर कोणत्याही उत्सवादरम्यान गर्दी झाली तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. लोकांनी जरी प्रवास केला तरी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. पुढचा एक महिना तरी लोकांनी जबाबदारीने वागायला पाहिजे. कारण, पुढच्या एका महिन्यात ही संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सद्यःस्थिती पाहता तिसरी लाट सप्टेंबरच्या अखेरपर्यंत येईल असे सांगितले जात आहे. तसेच, ती दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल असेही डॉ. सुपे यांनी सांगितले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण, जेव्हा खूप लोक प्रवास करतात तेव्हा असे निदर्शनास आले आहे की, व्हेरिएंट एकाकडून दुसरीकडे पसरतो आणि तो वाढतो. मग तो आंतरराष्ट्रीय प्रवास असो किंवा बस प्रवास, रेल्वे प्रवास असो या सर्वातून संसर्ग वाढल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे, जर लोकांना शक्य असल्यास प्रवास टाळला पाहिजे. शिवाय, कोरोना नियमांचे पालन करायला हवे, असे तुपे यांनी म्हटले आहे.

मंडळनिहाय दैनंदिन मृत्यू

रायगड - १९

पुणे - १२५

सिंधुदुर्ग -६

रत्नागिरी - ३

सांगली - ९

सातारा - ३४

loading image
go to top