esakal | 4 जुलै रोजीच आली तिसरी लाट, संशोधकाचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना

4 जुलै रोजीच आली तिसरी लाट, संशोधकाचा दावा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Third Wave of Corona: देशात सध्या कोरोनाची तिसरी आलेली आहे का? हैदराबादमधील वरिष्ठ संशोधकांनी या प्रश्नाचं उत्तर हो असं दिलं आहे. वरिष्ठ संशोधक डॉ विपिन श्रीवास्‍ताव यांच्यामते 4 जुलै रोजी भारतामध्ये तिसरी लाट आली आहे. प्रसिद्ध संशोधक डॉ विपिन श्रीवास्‍ताव मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गाची संख्या आणि मृत्यूदर याचं विश्लेषण करत आहेत.

हैदराबाद विद्यापीठाचे उप प्राचार्य राहिलेले श्रीवास्‍ताव म्हणाले की, 'चार जुलै रोजी आढळलेले कोरोनाचे नवे रुग्ण आणि मृताची संख्या तिसऱ्या लाटेचा इशारा करत आहे. चार जुलैपासून देशात तिसरी लाट आल्याचा अंदाज आहे. फ्रेब्रुवारी 2021 च्या पहिल्या आठवड्यात ज्याप्राणे आकडेवारी होती, तशीच परिस्थिती चार जुलै रोजी पाहायला मिळाली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं चाहूल दिली होती. त्यानंतर मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहा:कार माजवला होता.'

हेही वाचा: Corona Update : देशात 24 तासांत 31,315 नवीन रुग्ण

कोरोना नियम न पाळल्यास कोरोनाची तिसरी लाट अधिक वेगानं येईल असा इशारा श्रीवास्‍ताव यांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरण हेच प्रयाय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. श्रीवास्ताव यांनी मागील 461 दिवसांच्या कोरोनाच्या आकडेवारीच्या विश्लेषणावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधला आहे. डेली डेथ लोड (डीडीएल)' या टेक्निकच्या आधारावर श्रीवास्ताव यांनी कोरोनाच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं आहे.

loading image