esakal | माणुसकीचं दर्शन! मस्जिदमध्ये उभारलं कोविड सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

माणुसकीचं दर्शन! मस्जिदमध्ये उभारलं कोविड सेंटर

माणुसकीचं दर्शन! मस्जिदमध्ये उभारलं कोविड सेंटर

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनामुळे ओढावलेल्या संकटाने अनेकांमधील माणसुकीचं दर्शन घडवलं आहे. अनेक जण निस्वार्थपणे गरजुंच्या मदतीसाठी पुढे धावून आल्याचं पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी ऑक्सिजन बेड, कोविडसेंटरची कमतरता भासत होती त्याठिकाणी अनेकांनी पदरचे पैसे खर्च करुन ऑक्सिजन बेडची सोय केली. तर, काही जणांनी त्यांचं राहतं घर कोविड सेंटरसाठी (covid centre) दिलं. यामध्येच एक हैदराबादमधील एक मस्जिद (mosque) चर्चेत आली आहे. गरजु कोविडग्रस्तांसाठी संपूर्ण मस्जिद कोविड सेंटरसाठी देण्यात आली आहे. (this hyderabad mosque turns into covid centre)

४० बेडची केलीये सोय

हैदराबादमधील राजेंद्रनगर येथे असलेली एक मस्जिद कोविड सेंटरसाठी देण्यात आली आहे. मस्जिद ए मोहम्मदी असं या मस्जिदचं नाव असून तेथे ४० बेडची सोय करण्यात आली आहे.

कोविडग्रस्तांसाठी लागणाऱ्या सुविधांचीही केली सोय

विशेष म्हणजे या मस्जिदमध्ये कोविडग्रस्तांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सोयीसुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मस्जिद प्रशासनाने हेल्पिंग हँड फाऊंडेशनच्या मदतीने त्यांनी ही सोय केली असून ही व्यवस्था मोफत असणार आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'नुसार, येथे एक शाळादेखील आहे. शाळेतील २० वर्गखोल्यामध्ये कोविड रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्गात ३ कोरोनाग्रस्तांची व्यवस्था करण्यात येईल सोबतच प्रत्येक रुग्णाकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारीदेखील या कोविडसेंटरवर असतील. विशेष म्हणजे २४ तास रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आली आहे.

दरम्यान, या कोविड सेंटरमध्ये ५० वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. हे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करत असून यात चार डॉक्टर, चार नर्स आणि चार परिचारक आहेत. तसंच या सगळ्यांची शिफ्ट ६ तासांची आहे. सोबतच फिजिओथेरपिस्ट आणि डाएटिशिअनदेखील असतील.