

From Vegetable to Dessert: Taste the Iconic Snake Gourd Sweet of Varanasi
esakal
उत्तर प्रदेशची सांस्कृतिक राजधानी असलेल्या वाराणसीची मिठाईची परंपरा देशभर प्रसिद्ध आहे. या परंपरेतील एक आगळीवेगळी आणि शाही मिठाई म्हणजे पडवळाची मिठाई. पडवळ या भाजीपासून तयार होणारी ही मिठाई आकर्षक हिरव्या रंगामुळे आणि अप्रतिम चवीमुळे खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरते. वाराणसीसह बिहारमध्ये सण-उत्सव, लग्नसमारंभ आणि इतर शुभकार्यांमध्ये या मिठाईला मोठी मागणी असते.