मोदींवर टीकेनंतर अनुपम खेर यांचा 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न

anupankher nartendra modi
anupankher nartendra modi
Summary

अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी पहिल्यांदाच केंद्र सरकारवर टीका केली होती.

नवी दिल्ली- अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी पहिल्यांदाच केंद्र सरकारवर टीका केली होती. आज शुक्रवारी त्यांनी चार ओळींचं ट्विट करत याप्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. जे लोक काम करतात, त्यांच्याकडूनच चुका होतात. जे काहीच करत नाहीत, त्यांचे आयुष्य दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात संपून जातं, असं ते ट्विवमध्ये म्हणाले आहेत. अनुपम खेर यांनी या ट्विटच्या माध्यमातून डॅमेज कंट्रोलिंगचं काम केल्याची चर्चा आहे. (Those Who Work Make Mistakes Anupam Kher After Image Building comment)

अनुपम खेर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली होती. खेर सातत्याने भाजप आणि पंतप्रधान मोदींचे समर्थन करताना पाहायला मिळाले आहेत. पण, कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे भाजप समर्थकांनाही त्यांचे समर्थन करणे अशक्य झाले आहे. त्यात अनुपम खेर यांनी उघडउघड मोदी सरकारवर टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, आता पुन्हा एकदा अनुपम खेर भाजपच्या समर्थनात पुढे आल्याचं पाहायला मिळालं आहे.

अनुपम खेर एनडीटीव्हीला दिलेल्या मुखाखतीत म्हणाले होते की, कुठेतरी त्यांच्याकडून चूक झाली. त्यांना समजायला हवं की स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. सध्याची जी कोरोना स्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरायला हवं. अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारवर टीका करणं महत्त्वाचं आहे. ज्यांनी निवडून दिलेय त्यांच्यासाठी काम करण्याची सध्या नितांत गरज आहे. याच गोष्टीचं समोरच्या पक्षाने भांडवल करणंसुद्धा चुकीचं आहे.

anupankher nartendra modi
प्रतिमा नव्हे,जीव महत्त्वाचे;अनुपम खेर यांची केंद्रावर टीका

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचं दिसतंय. मानवी मन नसलेली व्यक्तीच अशा घटना पाहून दु:खी होणार नाहीत. सध्याच्या घडीला मोदी सरकारनं प्रतिमा सुधारण्यापेक्षा दुसरंही खूप महत्त्वाचं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे, असा खोचक सल्ला खेर (Anupam Kher) यांनी मोदी सरकारला दिला होता. दरम्यान, अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत. तसेच अनुपम खेर भाजपचे कट्टर समर्थक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com